शैक्षणिक उपक्रम

वाचनालय

पुस्तक हे सर्वोत्तम शिक्षक आहेत असा देवस्थानचा विश्वास आहे. समाजातील लोकांना उच्च प्रतीचे वाङमयसाहित्य प्राप्त व्हावे हा एकमेव उद्देश समोर ठेवून लोकांसाठी नवीन सुसज्ज, आरामदायी व सुनियोजित वाचनालय सुरु व्हावे असा देवस्थानाचा मानस आहे. या वाचनालयात अनेकाविध सुविधा पुरविण्यात येतील. साहित्य, कविता, कथा, आत्मचरित्र, लहान मुले, माहिती तंत्रज्ञान, संदर्भ, इतिहास आदि विविध विषयांवरील उच्चप्रतीची पुस्तके, वाचकांना अतिशय कार्यक्षम सेवा पूरविणारी स्वयंचलित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) यांसारखी अनेकाविध वैशिष्ट्ये असणारे हे वाचनालय मालाडमध्ये अभिमानास्पद ठरेल.

दुर्गम-डोंगराळ भागातील शाळेला मदत

आज शिक्षण व्यवस्थापनावर खूप चर्चा होत आहे. अशा वातावरणात कोकणातील रत्नगिरी जिल्ह्यातील एक गाव ‘उमरोळ’ डोंगराळ भागाने व्यापलेला तालुका ‘मंडणगड’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण.

अशा गावात स्वामी नावाच्या कार्यकर्त्याने काही वर्षापूर्वी ‘स्वामी शिक्षण संस्था’ स्थापन केली. पैसा नाही. पण जिद्द. या विभागातील मुलींसाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली. करमर करांच्या जागेत सुरु केलेल्या या शाळेत सुरुवातीला पंचवीस विद्यार्थीही नव्हते. सरकार दरबारी नोंद झालेली, पण डोंगराळ भागाला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्र सरकारने अनुदानित केलेली नाही.

बालवाडी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा बांधवांसाठी करण्यात येणार्‍या कार्याचाच एक भाग म्हणून मालाड देवस्थानात बालवाडी सुरू करण्यात आली. या बालवाड्यांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पूढील शालेय जीवनात विशेष चमक दाखविल्याचे आढळून आले आहे. ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणूस एक सशक्‍त व सुसंस्कृत समाज घडवितो. उमलत्या वयात होणारे संस्कार आयुष्याच्या वाटेवर शिदोरी म्हणून कामी येतात. झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमास असेच उत्तरोत्तर यश मिळो अशी भावना मालाड रहिवाश्यांकडून व्यक्त केली जाते. तसेच महानगर पालिकेच्या शाळेतही बालवाडी घेणे.

अभ्यासिका

शहरातील जागांचा अभाव ही सर्वज्ञात समस्या. या जागेच्या अभावामुळे अर्थातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व पर्यायाने त्यांच्या भावी आयुष्यातील व्यावसायीक वाटचालीवर होणे हे अपरिहार्य. ही विद्यार्थ्यांची समस्या ओळखून देवस्थाने उपलब्ध करुन दिलेली सुविधा म्हणजेच अभ्यासिका. शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि अभ्यासासाठी लागणार्‍या शांत जागेचा अभाव यांमुळे होणारा अपरिहार्य तोटा आता विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे सहन करावा लागत नाही. उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासिकेची सुविधा मालाडमध्ये लाभली आहे. या विशेष उपक्रमामागील उद्देश हा विद्यार्थ्यांना अभ्यासावरील लक्ष केंद्रीत करता यावे व त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आहे. अभ्यासिकेतील अंतर्भाग हा खासकरुन जास्तीत जास्त लक्ष अभ्यासावर केंद्रित करता यावे यादृष्टीने आरेखला गेला आहे. अनेक विद्यार्थी सदर अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.

विद्यार्थ्यांचे कौतुक

पुढे जाण्याची उमेद वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रतीभेला प्रोत्साहन देणे गरजेचे असते. मालाड देवस्थान ट्रस्ट हे मालाडमधील विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. हे कौतुक विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आणि अधिकधिक यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन देते. ही यशाची पावती, कौतुक आणि आशिर्वाद विद्यार्थ्यांमध्ये पूढे उत्तरोत्तर यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी निश्चितच आत्मविश्वास निर्माण करतात.

आरोग्य

आर्थिकदृष्ट्या गरीब लोक पैशाअभावी वैद्यकिय तपासणी करु शकत नाहीत नियमीत वैद्यकिय सल्ला शिबिरे, रक्‍तदान शिबिरे, विशिष्ट रोग शिबिर देवस्थानने आयोजित केली आहेत. ही शिबिरे मालाडमध्ये खुप लाभदायक ठरली आहेत.