अपंगासाठी
मालाड देवस्थान ट्रस्टने अपंगांसाठी खुप उपक्रम राबवले आहेत. मालाड देवस्थान ट्रस्टने अपंग/ विकलांग लोकांना समाजातील मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शक्य ते प्रयत्न घ्यायला हवेत. यासाठी या विकलांग/ अपंग लोकांकडे खास लक्ष पुरवले पाहिजे. समाजातील गरजू घटकांना मदत पुरवण्यासाठी मालाड देवस्थान ट्रस्ट हे नेहमी प्रयत्नशिल राहिले आहेत. अपंग लोकांबद्दल मालाड देवस्थान ट्रस्ट फार भावुक आहेत आणि त्यांचा हाच भावुकपणा अपंग लोकांसाठी मदतीचा सशक्त हात पुरवण्यामागची प्रेरणा आहे.
स्त्रियांसाठी
स्त्रिया हया कुटुंबाचा पाया असतात. पण खुप वेळा त्यांना दुर्लक्षित केल्या जातात. मालाड देवस्थान ट्रस्टने स्त्रियांना विविध सुविधा पुरवुन नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे. स्त्रियांना तांत्रिक शिक्षण पुरवता यावे या करता संगणक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली. मालाड देवस्थान ट्रस्टने गरीब स्त्रियांसाठी शिधा वाटप आणि वस्तु वाटप असे उपक्रम राबवले आहेत. स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या मानसिक व शारिरिक उत्कर्षासाठी योगाभ्यास केंद्र, जॉगर्स पार्क, सुरु करुन मालाड देवस्थान ट्रस्टने स्त्रियांची जिवनशैली सुदृढ केली आहे.
सिंधू ताई सकपाळ
माई म्हणजे निराधारांची माय अनथांची सावली. मग्रुर वृतीला वठणीवर आणणारी स्त्री शक्ती. आदिशक्तीच्या विविध रूपात कार्य करणारी, महाराष्ट्राची आधारवड असलेल्या आदरणीय सिंधुताई, निराधार बालकांसाठी साता समुहापर जाणाऱ्या ताई.
आपल्या कार्याची ओळख करून देवून हजारो ‘डॉलर्स’ मदत मिळविणाऱ्या या स्त्री सक्तीचा आम्ही सामन्य जननी सन्मान केला त्यांच्या कार्याला ‘सलाम’ केला आणि झोळीत ३ लाख – तीन लाखाची समिधा टाकली.
ज्येष्ठ नागरिकांकरता पाळणाघर
मालाड देवस्थान ट्रस्ट ज्येष्ठ नागरिकांना अनुभवाचा खजिना समजतात त्यांच्यामते हा खजिना समाजाने व्यवस्थित सांभाळला पाहिजे. ज्येष्ठ लोकांची काळजी घेणे हे फक्त त्यांच्या कुटुंबियांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ लोकांकडुन मिळणारा अनुभव तरुणांसोबत विभागणे गरजेचे आहे. ज्येष्ठ लोकांची या वयात काळजी घेणे गरजेचे आहे. मालाड देवस्थान ट्रस्टने मालाड मधिल ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.