ट्रस्टी

मालाड देवस्थान ट्रस्टचे विद्यमान सदस्य खालीलप्रमाणे
सदस्य माहिती
श्री श्रीपाद निलकंठ त्रैलोक्य (चेअरमन)
१९८० सालापासून मालाड देवस्थान ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभाग घेण्यापूर्वी श्री त्रैलोक्य हे राजकरणात सक्रीय होते त्यामुळे त्यांचा देव धर्माशी सबंध नव्हता. त्यांच्या राजकीय पाश्वभूमी मध्ये त्यांची सुरवात राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून झाली. साने गुरुजी, एस. एम. जोशी यांच्या सानिध्यात राहण्याचा आणि काम करण्याचा योग त्यांना मिळाला. त्यानंतर राजकारण म्हणजे समाजकारण या भक्तीने काम करीत असताना कालांतराने मुंबई कॉंग्रेसच्या मालाड विभागाचे पद त्यांनी भूषविले. याच सुमारास या मंदिराचे वारस कै. पुरूषोत्तम दादोबा महंत यांनी राम मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी अध्यक्षपदी नियुक्ती केली. अशा प्रकारे गेली ३२ वर्षे ते देवळाच्या सहवासात आहेत.
श्री दिलीप सदानंद म्हात्रे – सेक्रेटरी
१९८० साली ते विश्स्त सेक्रेटरी झाले. सामाजिक जीवनात त्यांचे कार्य चालू होते. ‘प्रयोग मालाड’ या संस्थे द्वारे त्यांनी नाट्य कला सांस्कृतिक क्षेत्राची सेवा केली आहे. अनेक समाजिक संस्थेशी त्यांचा संबंध आहे. मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी ते काम पहात असतात. तसेच इतर समाजाच्या मान्यवर व्यक्तींशी त्यांचा परिचय आहे. २०११ साली स्टेट बँक मधून सेवा निवृत्त होताच मालाड देवस्थान ट्रस्टच्या कार्यात वेळ देवून ‘ स्वप्नातील श्री राम मंदिर ‘ अस्तित्वात आणण्याचे नेतुत्व त्यांच्याकडे आहे. अशा हया ध्येवादी माणसाच्या हातात श्री राम मंदिर – ‘भव्य योजनेची’ जबाबदारी सोपविली आहे.
श्री संदेश श्यामराव महंत
पूर्व विश्स्त कै अनंत नारायण महंत यांचे पुतणे, महंत घराण्याचे प्रतिनिधी म्हणून यांनी प्रवेश केला असून या नव्या चळवळीचे शिलेदार आहेत.
श्री गजानन केसरीनाथ रावते
जेष्ठ नागरिक, गावचे भूमिपुत्र, शिस्तशीर असे हे व्यक्तिमत्व. कार्यालयीन काम पाहणारे विश्स्त आहेत.
श्री नरेंद्र किसन मंत्री
समाजिक कार्याची आवड असून पांचाळ समाजाचे कार्यकर्ते आहेत.